जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहातील संशयित व्यक्तींना कायदेविषयक जनजागृती अभियानातून मार्गदर्शन व ब्लँकेट वितरण करण्यात आले.

सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सुचनानुसार घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ए.ए.के. शेख, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, अ‍ॅड. अमित सोनवणे, अ‍ॅड. प्रविण पांडे, गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता यांनी मार्गदर्शन केले. रोटरी गोल्डसिटीचे सदस्य राहूल जैन यांच्यातर्फे ब्लँकेट वितरण करण्यात आले. यावेळी प्रकल्प प्रमुख राहूल कोटेचा, प्रखर मेहता, संजय दहाड, राहूल कोठारी, आनंद गांधी आणि एस.एस.मणियार लॉ कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थितीत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज