जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । केसीई’च्या आयएमआर मध्ये शिवजयंती निमित्ताने “कालातीत शिवराय” या विषयावर ऍड. शुभंकर अत्रे यांचे व्याख्यान संपन्न झाले. सुरवातीला प्रस्तावना डायरेक्टर प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी केली. वक्त्यांची ओळख डॉ.शमा सराफ यांनी करून दिली.
व्याख्यानात अ़ॅड. शुभंकर अत्रे म्हणालेत, ” शिवराय हे कालातीतच आहे. शिवराय हा आभ्यासाचा विषय आहे. हा विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने लोकमान्य टिळकांपासुन अनेक अभ्यासकांनी हाताळला आहे. शत्रुला कसे हरवायचे..हि शिवरायांची रणनीती हि शुक्रनीतीवर आधारीत आहे. १६१८ महाराजांवर पोर्तुगीज मध्ये चरीत्र लिहीले गेले होते.
त्यातला महत्त्वाचा पैलू लिडरशीप. लिडरशीप म्हणजे जिथे धोका आहे तिथे सगळ्यांचे आधी जाऊन उभे राहाणे..अभझलखानाला भेटायला शिवाजी स्वतः गेले.. त्याला एकट्याला गाठुन ठेचले..त्यांचे १० लोक होते..आपले १० लोक होते. त्यांचे दाही लोक मेलेत…आपले दाही लोक वाचलेत..ज्या क्षणी तो वाईचा घाट, उतरला त्या क्षणी तो असुरक्षित झाला होता….त्याचे सैन्य मारले गेले…शिवरायांची रणनीती हि कॄष्णाला पॅररल जाते…कॄष्णाने कंसाला मारले..कंसाला मारून कॄष्णाने जरासंधाला मेसेज दिला,
आपल्या आगमनाचा. शाहिस्तेखानला स्वतः जाऊन भिडले होते शिवाजी. शाहिस्तेखानला जेंव्हा मारले तेंव्हा तो अजगरासारखा पडला होता..तेव्हा माहाराजांनी अचानक सर्जिकल स्टाईक केला. आग्र्याला अडकले तेव्हा आधी आपल्या सगळ्या फौजेला परत पाठवुन दिले , मग त्यांनी स्वतः ला सोडवले. शिवरायांच्या रणनीतीचा दुसरा पैलू, स्टडींग द इन्हायरमेंट….जुन्नर पेठ लुटली अणि पुण्यात डेव्हलपमेंट केली सैन्यात सुधारणा केली…सुरत १६६४ला पहिल्यांदा लुटली..त्यांचे हेर तिथे आधीच होते.. बहिर्जी त्याच्या टिमबरोबर तिथे होते. महाराज तिथे पोहोचले .तेव्हा इनायत खानाने इंग्रजांना मदत मागितली. इतके मोगल साम्राज्य जागरूक होते.
शिवरायांनी या गोष्टींचा पुर्ण फायदा करून घेतला. महाराज हे शांत डोक्याने विचार करणारे होते. आग्रा भेटीत तर हा सह्याद्रीचा सिंह असा गरजला..परत बादशाहाचे तोंड बघणार नाही म्हणालेत, तेव्हाच शिवाजी महाराज मारले जाणार होते.बादशाहाचे १२ लोक त्यासाठी आग्रही होते..पण पुढच्या १५ दिवसात हे १२ लोक महाराजांना अनुकूल झाले. शिवरायांचे चरीत्र वाचतांना लक्षात येईल एकदा झालेली एक चुक परत कधीही रिपीट झाली नाही. जयसिंगरावांबरोबरच्या युध्दात शिवाजी महाराजांना २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले पण आग्राहुन सुटून आल्यावर ,परत आल्यानंतर त्यांच्याकडे १८ किल्ले होते.. नंतर ,३ वर्ष त्यांनी फक्त तयारी केली..काय कमी पडते आहे , त्याचा अभ्यास केला. पुढच्याच आठ वर्षांत २६० किल्ले माहाराजांनी घेतले.तानाजी मुरारबाजी सारखे माणसे गमवली.पण करुन दाखवले.
शिवरायांच्या युध्दनितीचा पुढचा पैलू होता,प्रॅक्टिकॅलीटी..शाहाजींना सोडवण्यासाठी तोरणा सोडला होता महाराजांनी..त्यांनी शहाजहानला पत्र लिहिले..एका पत्राद्वारे त्यांनी एका बादशाहाला घाबरले होते.
प्रचंड दक्षिण विजया मिळवून महाराज परत आले..तेव्हा महाराजांचे प्रचंड वैभव होते..त्यांनी अलायन्स तयार केले.. कारण ते नंतर येणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याला तोंड देण्यासाठी होते…
पंतप्रधान हा राजांच्या शब्दकोशातला शब्द होता.त्यांनी पत्रांचे मायने ठरवले..भाषेवर काम केले. व्यवस्थित मार्केटींग ही केले.फार बारीक काम केले.. सिंधुदुर्गचे बांधकाम केले..तिथे सिमेवरचे गाव होते.. तेथील पंडीत भुमीपुजन करायला ही तयार नव्हते..पण त्याभागाच्या लोकांवरचे प्रेशर कमी केले. नंतर त्यांनी तयार केले आरमार. येणार्या व्यापार्यांना खुप चांगलीच ट्रिटमेंट दिली..तेच लोकांनी जगभर जाऊन शिवरायांची लोककल्याणकारी प्रतिमा पोहोचविली.. शिवरायांचचे मार्केटिंग टॅक्टीज फार महत्वाचे होते.
शिवरायांचे चारीत्र्य वादातीत होते..दक्षिण दिग्विजयानंतर येताना महाराजांच्या एका सरदाराने मल्लमांचा विनयभंग केला.पण महाजरांनी त्या सरदारांचे डोळे काढले.मल्लमांने त्यांचे मंदिर बांधले आहे.
१६५१ ला महाराजांनी बजेट तयार केले होते..माणसे एकनिष्ठ होती..हि निष्ठा मुघलांकडे नव्हती..२६० किल्ल्यांचे मॅनेजमेंट कसे होते? त्यावरचे हवालदार कसे निवडले? हा अभ्यासाचा विषय आहे.असा मनुष्य या मातीत घडला आहे. त्याचे चरीत्र्य सर्वप्रथम पोर्तुगीज मध्ये लिहीले गेले. सुरतलुटीची बातमी लंडनच्या पेपरमध्ये त्यावेळी आली होती. आभार डॉ. शमा सराफ यांनी मानले.