गॅस रिफिलिंग प्रकरणातील म्होरक्या गवसला, चार दिवसांनी अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ ।  भुसावळ येथील खडका रोड भागातील पटेल कॉलनीत घरगुती गॅस अवैधपणे वाहनात भरणाऱ्यांवर दि.११ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणातील पसार असलेल्या मुख्य म्होरक्या वसीम अब्दुल मशीद पटेल ( वय ३०,) यास सोमवारी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

सविस्तर असे की, भुसावळ शहरातील पटेल कॉलनीत गुरुवारी रोजी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यात ९ घरगुती सिलिंडरसह दोन रिक्षा व अन्य मुद्देमाल मिळून १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गॅस वाहनात भरणारा सलमान अब्दुल माजिद पटेल (वय ३०, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ), रिक्षा चालक आरिफ खान इसाफ खान (वय ३५, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (वय ४३, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक केली होती.

मात्र, मुख्य संशयित वसीम पटेल पसार होता. तो वरणगाव रोड भागात आल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज