fbpx

अज्ञात वाहनाच्या धडकेत वकिलाचा मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । शहरातील ईच्छादेवी चौफुली जवळ पहाटे सहा वाजेच्या सुमारास असलेल्या एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान अपघातात मृत व्यक्ती वकील असल्याचे कळते.

शिवाजीनगर परिसरातील रहिवासी सतीश शंकर परदेशी वय-४३ यांचे वडील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. परदेशी हे त्याठिकाणी थांबलेले असताना काही कामानिमित्त ते सकाळी सहा वाजेच्या सुमारास ईच्छादेवी चौफुली जवळ गेले होते. शासकीय गोदामसमोर अज्ञात वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात आणला आहे. अपघातात ठार झालेली व्यक्ती वकील असून त्यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. दरम्यान अपघात कशा प्रकारे झाला हे अद्याप कळू शकलेले नसून पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज