वेटिंग तिकिटापासून सुटका, रेल्वेच्या ‘या’ नव्या सुविधेचा ३० टक्के प्रवासी घेताय लाभ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । आयआरसीटीसी ने प्रवाशांच्या सुविधेसाठी पुशअप नावाची सुविधा सुरु केली आहे. या सुविधेनुसार आता संबंधित मार्गावर जर एखाद्या रेल्वेत बर्थ शिल्लक असेल तर अशा प्रवाशांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. या सुविधेला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुशअप या नव्या सुविधेमुळे प्रवासी ज्या मार्गावर प्रवास करणार आहे, त्या मार्गावरील ज्या गाडीमध्ये सीट उपलब्ध असेल त्या सीटचा मेसेज मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. उदा. जळगावचा प्रवासी जळगाव-मुंबई वा जळगाव-पुणे धावणाऱ्या गाडीचे तिकीट काढत असेल आणि या गाड्यांचे तिकीट फुल्ल असेल तर अशा वेळी पुशअपचा पर्याय निवडला तर तुम्ही सर्च केलेल्या हिस्ट्रीचा आधार घेतला तर या मार्गावरील कोणत्याही गाडीचे सीट उपलब्ध झाले तसा मेसेज प्रवाशाला येईल. मेसेज आल्यानंतर त्या रेल्वे प्रवाशाला तिकीट काढता येणार अाहे.

वेटिंग तिकिटापासून सुटका

जळगावचे अनेक प्रवासी मुंबई, पुणे व लांब पल्ल्यासाठी प्रवास करतात. अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यात कन्फर्म तिकीट मिळावे म्हणून चार महिने आधीच तिकीट काढण्याची घाई करतात; तर काही वेटिंग तिकीट काढून कन्फर्म होण्याची वाट पाहतात. यात काहींचे तिकीट कन्फर्म होते तर काहींचे होत नाही. मात्र, आता या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळून प्रवाशांची वेटिंग तिकिटापासून सुटका होईल.

मोबाइल क्रमांक रजिस्टर होणे गरजेचे : आयआरसीटीसीने (इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी प्रवाशांनी पुशअॅप नोटिफिकेशसाठी आपला मोबाइल क्रमांक रजिस्टर करणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या मोबाइलवरच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठवला जाईल. यासाठी कोणत्याही प्रकाचे शुल्क आकारले जाणार नाही.३० टक्के प्रवाशांचे मोबाइल रजिस्टर : आयआरसीटीसीने पुशअप अॅपची सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत ३० टक्के प्रवाशांनी आपले मोबाइल नंबर रजिस्ट्रेशन केले आहे. भविष्यात यात अजून वाढ होणार आहे.

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या अशा

काशी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस आदी एक्स्प्रेस मुंबईकडे सुरू आहेत. तर गुजरातकडे नवजीवन एक्स्प्रेस, अजमेर-पुरी, ताप्ती एक्स्प्रेस, बांद्रा एक्स्प्रेस, ओखापुरी आदी गाड्या सुरू आहेत.या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar