fbpx

कोरोना अँटीजन विनामूल्य तपासणी केंद्राला सुरुवात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -१९ अँटीजन तपासणी केंद्र शनिवारी सुरु करण्यात आले.

उदघाटन प्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा उपस्थित होते.

रेडक्रॉस संस्थेचे कार्य नेहमी उत्तम असते. कोरोना काळात त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असून जळगावकरांना त्याचा नेहमी फायदा होत असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले. अँटीजन तपासणी केंद्र शहराच्या मध्यभागी म्हणजेच महानगरपालिका संचलित सानेगुरुजी वाचनालयातील टेबल टेनिस हाॅल, शासकीय रुग्णालयाच्या मागे सुरु झाले असून तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे.

सद्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे आणि रुग्णांची तपासणी लवकर झाल्यास उपचार लवकर करणे शक्य होईल. या सर्व बाबींचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने या केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देण्यात येत आहे. तसेच रविवारी देखील हि सेवा नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. या तपासणी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज