किरकोळ महागाई दरात मोठी वाढ, महागाईत महाराष्ट्र देशात चाैथ्या स्थानी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । काेरोनाच्या तडाख्यानंतर सर्वसामान्य आता महागाईत होरपळत आहेत. गेल्या काही महिन्यांतील महागाईचा दर डिसेंबरमध्येही कायम होता. डिसेंबरमधील किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमधील ४.९१ टक्क्यांवरून ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही ६ महिन्यांची उच्चांकी पातळी आहे. जुलै २०२१ मध्ये हा दर ५.५९% होता. नोव्हेंबरमध्ये तो ४.९१% आणि एका वर्षापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये ४.५९% होता.

कोरोना येण्यापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये महागाई दर ६.९३% होता. किरकोळ महागाई दराचा सर्वसामान्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्याने महागाई दरात तेजी आली आहे. एनएसओनुसार, गतवर्षाच्या तुलनेत खाद्यतेल, दूध, फळे, साखर, मिठाई, स्नॅक्स, कपडे, पादत्राणे, इंधन आणि वीज तसेच शिक्षणासह सर्वच महागले आहे. डिसेंबरमध्ये तेल व स्निग्ध पदार्थांचे दर वार्षिक आधारावर सर्वाधिक २४.३२% वाढले आहेत.

महागाईत महाराष्ट्र देशात चाैथ्या स्थानी
एनएसओकडून जारी रिटेल महागाईच्या राज्यनिहाय आकडेवारीत ६.६४ टक्क्यांसह हरियाणा पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर जम्मू-काश्मीर ६.५६, दिल्लीत ६.५५ टक्के महागाई दर आहे. चौथ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात ६.३३% किरकोळ महागाई दर आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar