तामसवाडी येथे २ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । तामसवाडी ( ता. पारोळा ) येथे बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील रोकड, दागिन्यांसह महागड्या साड्या असा एकुण २ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, रावसाहेब साहेबराव बेडीस्कर (वय-५०) रा. साईबाबा चौक, तामसवाडी ता. पारोळा हे कुटुंबियासह राहतात. हे शेती करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी व ५ ते ४ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान रावसाहेब बेडीस्कर हे घराल कुलूप लावून गेले होते.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी व कोयंडा तोडून घरात ठेवलेले ३५ हजाराची रोकड, १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे दागिने आणि ५ हजार रूपये किंमतीच्या महागड्या साड्या असा एकुण २ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रावसाहेब बेडीस्कर यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -