दोन घरांसह दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । शहरातील उस्मानिया पार्क या भागात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यात दोन घरे व एक दुकान फोडून रोकड, दागिने व लॅपटॉप असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी सात वाजता या घटना उघडकीस आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोत, १० हजार उस्मानिया पार्कमधील फिरोज पैशांचा गल्ला मोहम्मद रफिक बागवान हे पुण्याला नावेद अहमद गेले होते, तर त्यांचे कुटूंबीय बागवान कुटुंबीयांसह मोहल्ल्यात नातेवाइकांकडे मुक्कामी होते. नावेद होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा मागचा लोखंडी मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश तोडून घरातील केला. घरातील लोखंडी कपाट तोडून ८ ग्रॅमची सोन्याची घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याच्या रूपये रोख आणि चोरून नेला. त्याशिवाय शेख नासिर (वय ३४) हे नाशिक येथे लग्नाला गेले शेख यांच्या घराच्या दरवाजा चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडले. पोत, २ सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड लांबवली.

बागवान यांच्या शेजारी मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरिया शितपेयांचे होलेसेल दुकान देखील चोरट्यांनी तोडून लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि ८० हजार रूपयांची रोकड चोरली.

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, विजय निकुंभ, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -