जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । चोपडा येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरातील अध्यापक ललित बाळकृष्ण पाटील यांनी, इंग्रजी विषयात नुकतेच संशोधन पूर्ण केले. त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी.पदवी प्राप्त झाली आहे.
त्यांनी ‘अंड एक्स्प्लोरेशन इंटू तुकाराम्स पोएट्री थ्रु इट्स ट्रान्स्क्रिएशन बाय सिलेक्ट पोएट्स’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. फैजपूर येथील प्रा. डॉ. जगदीश पाटील हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या या यशासाठी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजा मयूर, अध्यक्षा शैलाबेन मयूर, सचिव माधुरी मयूर, संचालक चंद्रहास गुजराथी, भुपेंद्र गुजराथी, शाळेचे मुख्याध्यापक आर.आर.शिंदे व समन्वयक गोविंद गुजराथी यांनी कौतुक केले. प्रताप विद्या मंदिरातील उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी देखील त्यांच्या मेहनतीचे व अभ्यासाचे कौतुक केले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या इंग्रजी भाषांतरावरील या संशोधन कार्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.