यंदा २० नोव्हेंबरपासून सुरु होणार ‘लगीनघाई’

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून लग्न सोहळ्यांवर बंधने आली होती. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकावे लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनानेही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदा बॅण्ड बाजामध्ये बारात निघणार आहे. तुलसी विवाह होताच इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या २० तारखेपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होणार असून यावर्षी लग्नाचे तब्बल ६३ मुहूर्त आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून थांबलेले लग्न सोहळे यंदा पूर्ण तयारीने होणार आहेत. दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्न सोहळयाना सुरुवात होते. मात्र, लग्न जुळवणी व इतर तयारी आधीपासूनच करावी लागते. यावर्षी १५ नोव्हेंबरला तुळशी विवाह होणार असून त्यानंतर २० नोव्हेंबरपासून लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. यावर्षी लग्नाचे तब्बल ६३ मुहूर्त असून सर्वाधिक ११ मुहूर्त डिसेंबर आणि मे महिन्यात आहेत.

बुकिंगला सुरुवात
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व शासनानेही निर्बंध शिथिल केल्यामुळे आतापासूनच मंगल कार्यालये, कॅटरर्स, डेकोरेशन, बुकिंगला सुरुवात झाली आहे. यंदाचा लग्नाचा पहिला मुहूर्त काही दिवसांवर असल्याने बाजारपेठेत सध्या लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी पाहायला मिळणार आहे.

असे आहेत मुहूर्त
नोव्हेंबर : २०, २१, २९, ३०, डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, जानेवारी : २०, २२, २३, २७, २९, फेब्रुवारी : ५, ६, ७, १०, १७, १९, मार्च : २५, २६, २७, २८, एप्रिल : १५, १७, १९, २१, २४, २५, मे : ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७, जून : १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२, जुलै : ३, ५, ६, ७, ८, ९

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज