दाम्पत्याचा खून करणाऱ्या संशयितांना १ मे पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खून प्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांन १ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत असे की, शहराला लागून असलेल्या कुसुंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील (वय-५४) व त्याची पत्नी आशाबाई पाटील(वय-४७) यांचा दि २१ एप्रिल रोजी दोरीने गळा आवळून खुन करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने  देविदास नामदेव श्रीनाथ (वय-४० रा. गुरूदत्त कॉलनी, कुसुंबा), अरुणाबाई गजानन वारंगे (वय-३०, रा.कुसुंबा ता.जि.जळगाव), सुधाकर राजमल पाटिल (वय-४५ रा. चिंचखेडा तपवन गावठाण ता. जामनेर) या तिघांना अटक केली होती. त्यांना गुन्हयांबाबत सखोल विचारपुस करीत असतांना त्यांनी गुन्हयांची कबुली दिली.

पथकाने केलेल्या चौकशीत तिघांनी गुन्हा कबूल केला आहे. संशयीत अरुणाबाई हीने मयत आशाबाई हिचेकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुधाकर पाटील हा सुध्दा आर्थिक अडचणीत होता. मयतहिचे कडेस मोठया प्रमाणात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असून मयत हिला मारण्याचा व तिचे कडील रोखं रक्कम सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रथम कट रचला होता. सोबतीला देविदासची मदत घेण्यात आली. तिघांना बुधवार २१ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अगोदर मुरलीधर पाटील याचा गच्चीवर गळा आवळला. त्यानंतर आशाबाईला खाली घरात त्याच दोरीने गळफास देत ठार मारण्यात आल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे.

दरम्यान, आज या तिघांना न्यायालयात हजर केले असता तिघांना १ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज