कुसुंबा दाम्पत्याच्या खून प्रकरणी आठ संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावात एका दाम्पत्याची गळा आवळून निर्घूण हत्या झाल्याची घटना गुरुवारी दुपारी समोर आली आहे.चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी दोरीने गळा आवळून दोघांचा खून केल्याचा संशय आहे. परंतु तेथे बळजबरीने प्रवेश केल्याचे पुरावे पाेलिस तपासात आढळलेले नाहीत. अर्थात, हे दाेन्ही खुन त्यांच्या ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तींनी केले असावे, असा संशय असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनी दिली हे.

कुसुंबा गावातील घरात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता मुरलीधर राजाराम पाटील (वय ५३) व आशाबाई मुरलीधर पाटील (वय ४७) या दांपत्याचे मृतदेह आढळून आले. त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. खुन व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोने, रोख रक्कम चोरी झालेली आहे. त्याचे विवरण येणे बाकी आहे.

पाटील दांपत्य हे पैसे व्याजाने देत होते. त्या निमित्तानेही त्यांच्या घरी लोकांचे येणे-जाणे होते. पाटील दांपत्याने कुणाकुणाला व्याजाने पैसे दिलेले आहेत. त्यापैकी कुणी खुन केले काय? या अनुषंगानेही तपास सुरु आहे. दोघांचा खुन करण्यात आल्याने मारेकरी एकापेक्षा जास्त असल्याबाबत संशय असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज