fbpx

चटई कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा येथील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. समाधान आत्माराम पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे.

पारोळा तालुक्यातील बोदर्डे येथील मूळ रहिवासी असलेला समाधान पाटील हा तरुण गेल्या १७ वर्षांपासून कुसुंबा येथे राहतो. चटई कंपनीत काम करून तो कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणातून मानसिक तणावात होता. मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना गळफास घेवून त्याने आत्महत्या केली.

सायंकाळी ५ वाजता आई सुनंदाबाई घरी आल्या तेव्हा घडलेला प्रकार लक्षात आला. गल्लीतील नातेवाईकांनी तातडीने मृतदेह उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समाधानच्या पश्चात आई, भाऊ जितेंद्र, पत्नी, मुलगा समर्थ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज