एरंडोल नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कुणाल महाजन यांची बिनविरोध निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा आरती महाजन यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदाकरीता मंगळवार दि.२ रोजी निवड प्रक्रिया पार पडली. दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ कुणाल महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

एरंडोल नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा आरती अतुल महाजन यांनी राजीनामा दिल्यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवार दि.२ रोजी उपनगराध्यक्ष निवडीकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत कुणाल रमेश महाजन यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. एकाच उमेदवाराचे दोन्ही अर्ज वैध असल्याने कुणाल रमेश महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी काम पाहिले त्यासाठी त्यांना मुख्याधिकारी विकास नवाळे व कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार यांचे नगरपालिकेच्यावतीने तर तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष कुणाल महाजन यांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेविका छाया दाभाडे, नगरसेवक शेख जहिरोद्दीन कासम, डॉ. नरेंद्र ठाकूर, नगरसेविका प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, नगरसेवक ऍड. नितीन महाजन, नगरसेविका आरती महाजन, नगरसेवक मोमीन अब्दुल शकूर अलतीफ, नगरसेविका दर्शना ठाकूर, हर्षाली महाजन आदी उपस्थित होते. कुणाल महाजन यांची एरंडोल नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबदल त्याचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज