उपमहापौर गोळीबारातील मुख्य हल्लेखोर अटकेत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । शहर मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी महेंद्र राजपूत याला रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर तीन दिवसापूर्वी रात्री गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन किरण शरद राजपूत व उमेश पांडुरंग राजपूत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच मंगळवारी रात्री गुन्ह्यात वापरलेली चारचाकी क्रमांक एम.एच.४८ एफ १४२२ ही म्हसावदजवळ बेवारसपणे मिळून आली होती. गुन्ह्यातील मुख्य संशयीत महेंद्र राजपूत याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गोळीबार प्रकरणातील भूषण बिर्‍हाडे व जुगल बागुल हे सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -