fbpx

कृष्णापुरी भागातील शहर तलाठी कार्यालयाचे आ.किशोर पाटील यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ ऑगस्ट २०२१ । प्रतिनिधी पाचोरा पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जुन्या जीर्ण झालेल्या शहर तलाठी कार्यालयाची वास्तू पाडली गेल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच निधी अभावी शहर तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोय लक्षात घेता आ.किशोर पाटील यांनी तात्काळ दखल घेत आपल्या स्थानिक विकास निधीतून १२ लक्ष रुपयांचा निधी देऊन ही इमारत बांधकाम करत नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतल्याने आनंद व्यक्त होत आहे.

आज ता.१ रोजी महसुलदिनी पाचोरा शहर तलाठी कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा सकाळी ८ वाजता संपन्न झाला. तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी देणारे आ.किशोर पाटील हे जिल्ह्यातील पाहिले आमदार ठरले आहेत. त्याबद्दल महसूल प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर आ.किशोर पाटील यांनी महसूल दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता काजवे, सर्कल वरद वाडेकर, शहर तलाठी आर डी पाटील, पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे, साळुंखे अप्पा, बहिरे अप्पा, मयूर आगरकर यांचेसह सर्कल व तलाठी बांधवांसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज