10 वी पास असणाऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रात नोकरीची संधी, सातव्या वेतन आयोगानुसार पगार

बातमी शेअर करा

नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी पास उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. पुण्यातील बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये पदाचा तपशील, शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा इ. सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पदाचे नाव :

कुशल सहाय्यक

पात्रता :

दहावी किंवा समकक्ष इयत्ता पास असणे गरजेचे आहे. यासोबतच गार्डनमध्ये काम करण्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयाची अट :

सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC/PH उमेदवारांना वयाची सवलत देण्यात येणार आहे.

उमेदवाराने नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार अर्ज भरायचा आहे. स्वत:ची सही केलेल्या अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता आणि वयाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

परीक्षा फी :

अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेकडून पाचशे रुपयांचा डीडी देणे गरजेचे आहे. डीडी कृषी विज्ञान केंद्र, बारामती नावाने असणे गरजेचे आहे. एससी/एसटी आणि महिलांना शुल्क भरण्यातून सवलत देण्यात आली आहे.

पगार : 
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १८ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे.

करोना काळात अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे खासगी शाळांना आवाहन

कोटातील कोचिंग इन्स्टिट्यूट्स येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार

२८ ऑगस्ट २०२१ ला यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज पाठविणे गरजेचे आहे.

दिलेल्या मुदतीच्यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. टपाल विलंबासाठी केव्हीके व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना उपस्थित राहण्यासाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही.

अर्ज या पत्त्यावर पाठविणे : अध्यक्ष, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शरदनगर, मालेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, पिन -४१३११५

अर्जावर “सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज” असे लिहिलेले असावे.

जाहिरात (Notification) PDF

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -