कोळवदच्या शेतकऱ्याने पपई पिकावर फिरवला रोटर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । संकट आली की ती चौहीबाजूने येतात असाच काहीसा प्रकार सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीपातील पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे पण यातून सावरण्यासाठी पपई पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडलेली आहे. तालुल्यातील कोळवद शिवारात पपई पिकावर राेगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यावर संपूर्ण पपई बागेवर ट्रॅक्टर फिरवत बाग उपटून फेकली आहे.

कोळवद येथील शेतकरी अभय महाजन यांनी २ हजार रोपांची लागवड करून बाग फुलवली. मात्र यंदा परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे पपई बागेवर राेगराईचा प्रादुर्भाव जाणवू लागला. त्यावर वारंवार विविध औषधांची फवारणी करूनही फायदा हाेत नव्हता. उलट संपूर्ण पपईची बाग नष्ट हाेत चालली हाेती.

त्यामुळे या बागेतील राेगराई इतर पिकांमध्ये पसरून त्यांचेही नुकसान करू शकते, यासाठी खबरदारी बाळगून रविवारी शेतकरी अभय महाजन यांनी या पपई बागेवरच थेट ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर फिरवले. या पपई बागेसह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या पपई बागांचेही पावसानंतरच्या राेगराईमुळे मोठे नुकसान झाले आहे.

पपईच्या एका रोपाचा ७० रुपये खर्च आहे. लागवडीसाठी शेत तयार करणे, लागवड करणे, औषध फवारणी, खतांचा वेळाेवेळी नियमित डोस असा एकूण २ हजार रोपांवर खर्च झाला. या बागेपासून सुमारे सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र उत्पन्न तर दूरच; पण पपईच्या बागेसाठी आजपर्यंत झालेला सुमारे तीन लाखांचा खर्च देखील निघाला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज