जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । जुन्या वादातून एका तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भावेश पोपट पाटील, संदीप पोपट पाटील आणि शिवाजी पाटील (सर्व रा.खेडी बुद्रुक) असे मारहाण करण्याऱ्या तरुणांचे नाव आहे.

सविस्तर असे की, धनराज गजानन कोळी (२३,रा. हुडको खेडी बुद्धक) हा परभणी येथून गुरुवारी रात्री जळगावात आला. त्यानंतर वाहन लावून घराकडे जात होता. त्यावेळी जुन्या वादातून भावेश पोपट पाटील, संदीप पोपट पाटील आणि शिवाजी पाटील (सर्व रा.खेडी बुद्रुक) हे धनराज याला शिवीगाळ करू लागले. शिवीगाळ का करता आहे, असा जाब विचारल्याचा राग येताच, तिघांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील भावेश पाटील याने चाकू काढून धनराजच्या डाव्या हातावर व पोटावर वार केला. त्यात धनराज हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -