यावल येथे दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर चाकूहल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाने वासूदेव सुरेश पाटील (वय-३३) या तरूणावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांच्या माहितीनुसार, वासुदेव पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास वासुदेव पाटील हा घराच्या समोर उभा असतांना विलास उर्फ पिंटू सुकदेव सुर्यवंशी रा. शिवाजी नगर हा तिथे आला. विलासने वासूदेव पाटील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर वासूदेवने पैसे दिले नाही याचा राग आल्याने विलास सुर्यवंशी याने चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व हातातील चाकूने मानेवार व हाताच्या अंगठ्यावर वार करून जखमी केले.

जखमी तरूणाला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वासूदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विलास सुर्यवंशी यांच्यावर आज सकाळी ११ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज