किर्तनकारांना मोठा दिलासा; सरकार देणार पाच हजार रुपये मानधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ सप्टेंबर २०२१ |  कोरोना काळात भजन किर्तन बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळपास ४८ हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले होते. त्यामुळे किर्तनकार,टाळकरी यांना आर्थिक मदत मिळावी अशी शासनाला जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर दि ६ मे रोजी मागणी केली होती तसेच मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इमेलद्वारे मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या कलावंतांना महिन्याला ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

 

कोरोना काळात राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

 

आता श्रावण महिना संपला आहे आणि सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण काही दिवसांवर आले आहेत. अशा वेळेस गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता जमावबंदीसारखे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसंच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना आर्थिक मदत देण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच दिलासादायक असल्याचे, यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -