fbpx

एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ ।  एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना जामनेरमध्ये घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जामनेर तालुक्यातील एका गावात दोन भाऊ कुटुंबियांसह राहतात. त्यांना १६ वर्षाची एक आणि १५ वर्षाच्या दोन अशा तीन मुली आहेत. दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० वाजेच्या सुमारास घरातच्या वाड्यातून तीनही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली.

पालकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू मुली कुठेच आढळून आल्या नाहीत. रात्री १० वाजता पालकांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज