महाविद्यालयातून मुलीला पळविले; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । चहार्डी ( ता.चोपडा ) येथील एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष लावून पळवून नेल्याची घटना १५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान घडली.या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध येथील शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील शा.शि.पाटील महाविद्यालयातून १५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने एका १७ वर्षीय मुलीला आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना घडली आहे.याबाबत चोपडा शहर पोलिसांत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -