fbpx

खोटेनगरला पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, एक जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, खून पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज असून एक जण जखमी झाल्याचे समजते.

खोटेनगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटील उर्फ डेम्या याला मागील भांडणाच्या कारणावरून भोसकल्याची घटना शनिवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे हे पथकासह घटनास्थळावर दाखल झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.

महेश पाटील याचा खून मागील भांडणाच्या कारणावरून झाला असल्याचा संशय असून काही वर्षापूर्वी देखील त्याचे सैंदाणे नामक तरुणाशी भांडण झाले होते. हाणामारीत एक तरुण जखमी झाल्याचे समजते. हाणामारीत बापू संतोष राजपूत हा जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


Exclusive Video :

pachora smart city eknath shinde 1

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज