आजपासून सावद्यात खंडेराव महाराज यात्रोत्सव‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला गुरुवारी होणारा सावदा‎ शहरातील प्रसिद्ध असा खंडेराव‎ महाराजांचा यात्रोत्सव यंदादेखील कोरोनाचे शासकीय नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. स्थानिक व परिसरातील‎ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या‎ आठवडे बाजारातील देवस्थान‎ खंडेराव महाराज मंदिराचा दरवर्षी‎ मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला‎ यात्रोत्सव होतो.

दरम्यान,‎ कोरोनाची भीती पाहता यंदा मंदिरे‎ खुली केलेली असली तरी आरोग्य‎ विभागाच्या सूचना व नियमांचे‎ पालन करून गुरुवारी सायंकाळी ६‎ वाजता उत्सव साजरा होईल.‎ ‎ दरम्यान, या उत्सवाला बारा‎ गाड्या ओढण्याची ३०० वर्षांची‎ परंपरा आहे. त्यानुसार ९‎ डिसेंबरला पवार कुटुंबातील‎ सहाव्या पिढीला बारागाड्या‎ ओढण्याचा मान मिळेल.‎

परंपरेनुसार सुपडू पवार, वसंत‎ पवार, अशोक पवार यंदा राहुल‎ अशोक पवार यांचा मान आहे.‎ तत्पूर्वी, मंदिरात सकाळी आरती,‎ तळी भरणे पूजा, अभिषेक असे‎ कार्यक्रम होतील. संतोष जोशी हे‎ पौरोहित्य करतील. अशोक पवार‎ व राहुल पवार हे मंदिराची धुरा‎ सांभाळत आहे. भाविकांनी‎ मंदिरात दर्शनासाठी येताना मास्क‎ लावावा. फिजिकल डिस्टन्स‎ पाळावे. असे आ‌वाहन मंदिर‎ संस्थानने केले आहे.‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -