खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा प्लॅन; जाणून घ्या काय होता प्लॅन?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली.

दरम्यानं, जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची एकहाती सत्ता असून देखील भाजपाला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या १० दिवसांत जुळून आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. तसेच, या प्लॅनबद्दल फारसं कुणाला काही माहिती नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

असा ठरला सगळा प्लॅन?

“१० दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते”, असं खडसेंनी सांगितलं.

- Advertisement -

ठेकेदार पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यावर नगरसेवक नाराज होते. त्यामुळे नाराज नगरसेवक एकत्र आले. सर्व शिवसेनेकडे गेल्यानंतर बाकिच्या लोकांच्या मदतीने आज शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. तर बाकीचे बंडखोर आहेत”, असं खडसे म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

- Advertisement -

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar