fbpx

खड्डेमुक्त शहरासाठी चाळीसगावात सामाजिक संघटनांचे खड्डेपूजन व आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली असून शहरवासीयांना कुठल्याही नागरी सुविधा चाळीसगाव नगरपरिषदेमार्फत पुरविले जात नाही. त्यामुळे न.पा. च्या उदासीन धोरणा विरोधात राजकीय व सामाजिक संघटनाच्या वतीने शहरात सात दिवसीय सप्ताह आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून शहरातील स्टेशन रोड येथील वीर सावरकर चौकात राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने खड्याचे पूजन करण्यात आले. चाळीसगाव नगरपरीषदेत सत्ताधाऱ्यांचे सत्ता स्थापन झाल्यानंतर जवळपास ५ वर्षांचा कालावधी काही महिन्यात संपत आहे. असे असताना नगरपरिषदे तर्फे शहरात भुयारी गटारी होणार असल्याचे कारण सांगत रस्त्याच्या कामाना अडचण असल्याचे सांगून रस्ते केले जात नाही.

mi advt

त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर सपूर्ण प्रभागातील रस्ते नव्याने केली जात नसल्यामुळे शहरवासीयांचे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मधून मार्ग काढताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. सोबतच साथीचे रोग देखील शहरात संक्रमण करत असून अनेक रुग्न डेंग्यू व मलेरियाच्या आजाराने ग्रस्त आहेत. नगरपरिषदे च्या वतीने प्रभावी औषध फवारणी होत नसल्याने रुग्ण कमालीची त्रस्त आहेत.

या सर्व नागरीसुविधा शहरवासीयांना चाळीसगाव नगरपरिषदे मार्फत पुरविल्या गेल्या पाहिजे यासाठी रयत सेना, मेरा गाव मेरा तीर्थ, आम आदमी पार्टीच्या संयुक्तपणे शहरात सात दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शहरातील स्टेशन रोड येथील वीर सावरकर चौकात दि ५ रोजी सायंकाळी 5 वाजता खड्याचे पूजन सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले.

आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, मेरा गाव मेरा तीर्थ चे प्रवर्तक विजय शर्मा, खुशाल पाटील, किशोर पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तुषार निकम, सचिन राणे, रयत सेनेचे दीपक देशमुख, मुकुंद पवार, विलास मराठे, प्रदीप मराठे, स्वप्नील गायकवाड तर खेर्डे येथील गोकुळ पाटील, कल्पेश महाले, प्रकाश कुलकर्णी, सी सी वाणी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज