आरोग्य सुविधा मुबलक ठेवा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि लसीकरणाचे नियोजन योग्य रितीने करावे, आरोग्य सुविधा मुबलक असाव्यात यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवार दि.२९ रोजी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी, महाविद्यालये, वस्तीगृहे, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, फुले मार्केट या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात यावीत. या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. मोहाडी रुग्णालयात १०० ऑक्सिजन प्लांट आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णालयात आयसीयूचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. फुले मार्केटमध्ये व्यापारी, नागरिकांनी लस घेतली आहे किंवा नाही त्यासाठी सुद्धा नियोजन करण्यात यावे. ‘कोविशिल्ड’ लसी जिल्ह्यात सर्वापर्यंत पोहोतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar