केसीई सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । शहरातील के.सी.ई. सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालय व मु.जे.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रदर्शन व प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात पोस्टर प्रदर्शनासाठी ३८ विद्यार्थ्यांनी व प्रश्न मंजुषा मध्ये ८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी उत्कृष्ठ  पोस्टर व प्रश्न मंजुषाची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम क्रमांक काढून त्यांचा पुस्तक, पेनसेट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी पोस्टर प्रदर्शनाचे कामकाज प्रा.ज्ञानेश्वर न्हावी तर प्रा.जे.एन.चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. डॉ.कुणाल इंगळे व प्रा.हेमंत बेंडाळे यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेचे कामकाज पाहिले. प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये पी.जी. महाविद्यालयातील गायत्री कुमावत, दुर्गा रायपुरे तर मु.जे.महाविद्यालयातील वेदांतसिंग पाटील, प्रतीक्षा पाटील, नयना तळेले आणि पोस्टर प्रदर्शनामध्ये पी.जी. महाविद्यालयातील कामिनी सोनावणे व सावित्री शर्मा तर मु.जे.महाविद्यालयातील प्रतीक्षा पाटील, निकिता पाटील, गोविंदा गोपाळ, योगिता बारी, स्वप्नाली पाटील, भावना कुंभार यांनी बक्षिसे पटकावली. निकिता पाटील व पूनम मगर यांनी स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुरवात केली.

सदर स्पर्धांचे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.स.ना.भारंबे, प्राचार्य मु.जे.महाविद्यालय, प्रमुख अतिथी डॉ.व्ही.एस.झोपे, प्राचार्य,पी.जी.महाविद्यालय, मुख्य वक्ता म्हणून डॉ.केतन चौधरी तसेच व्यासपीठावर प्रा.जे.एन.चौधरी व प्रा.डी.आर.न्हावी हे उपस्थित होते.

डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. रामानुजन  यांचे गणित विषयातील महत्वाच्या  कार्याबद्दल उत्कृष्ठरित्या मांडणी केली. डॉ.स.ना.भारंबे यांनी डॉ.रामानुजन यांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करण्यासंबंधी विध्यार्थ्यांना सांगून त्यांच्यासारखे उत्कृष्ठ गणितज्ञ होण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. प्रा.व्ही.एस.झोपे यांनी मु.जे.महाविद्यालयमधील गणित विभागातील नामवंत आजी व माजी प्राध्यापकांचे शैक्षणिक उपक्रमांमधील कार्यांना उजाळा दिला, त्यात त्यांनी प्रा.विरमणी, प्रा.डॉ.के.बी. पाटील व आत्ताचे प्रा.जे.एन. चौधरी यांच्या कार्यांच्या उल्लेखाद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. आभार प्रदर्शन प्रा.डी.आर.न्हावी यांनी केले, तर सूत्रसंचालन पी.जी.महाविद्यालयातील विद्यार्थिनी हेमांगी पाटील हिने केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -