fbpx

दीडशे देशाचे राष्ट्रध्वज, ७० कार कंपन्यांचे लोगो तोंडपाठ असणारा कार्तिक

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । जळगावचे आजोळ असलेल्या पाच वर्षीय कार्तिक मिहीर भावे याने उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालीय. कार्तिक याला दीडशे देशाचे राष्ट्रध्वज ओळखता येतात.तर ७० कार कंपन्यांचे लोगो तो जाणतो.  तसेच त्याला देशातील सर्व राज्यांची व त्यांच्या राजधान्यांची नावे तोंडपाठ आहेत. त्याच्या या गुणांबद्दल त्याची गेल्या शुक्रवारी इंडिया बुकात नोंद झाली.  

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यांत आले. या कामगिरी बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तो प्रियंका व मिहीर भावे यांचा मुलगा असून नाशिक येथील संजीवनी व दिपक भावे तसेच जळगाव येथील विजया व संदिप कुळकर्णी यांचा नातु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज