जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । मध्यप्रदेश मधील नेपानगर जंगलात अप कर्नाटक एक्स्प्रेसला आज रविवारी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना समोर आलीय. रेल्वे चाकांच्या घर्षणातून S2 डब्याला आग लागल्याचे प्रवाश्यांच्या निदर्शनात आले. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, गार्ड तसेच नागरिकांनी पाणी आणि फायर एक्सतुगशार ने आग विझवली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजतेय.
अप-12628 नवी दिली-बेंगरुळु कर्नाटक एक्स्प्रेसच्या S2 डब्याला आज दुपारीच्या वेळेस नेपानगर जंगलात आग लागल्याची घटना समोर आलीय. रेल्वे चाकांच्या घर्षणातून आग लागल्याने S2 डब्यातील प्रवाश्यांना चटके बसल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनात आले.
त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला व सर्व प्रवाशी आपला जीव वाचवून रेल्वे खाली उतरू लागले. दरम्यान, गार्ड तसेच नागरिकांनी पाणी आणि फायर एक्सतुगशार ने आग विझवली.
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस LTT-जयनगर एक्स्प्रेस (पवन एक्स्प्रेस)चे काही तब्बे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. या अपघातामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक हे विस्कळीत झालं होते. तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आला होते. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.