तृतीयपंथी करीना दीदी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील जुना ममुराबाद नाका, चौघुले प्लॉटजवळ राहणारे तृतीयपंथी करीना दीदी वय-३७ यांचे शनिवारी पहाटे ४.१५ च्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

चौघुले प्लॉट परिसरात असलेल्या जुना ममुराबाद नाका समोर करीना दीदी वय-३७ या तृतीयपंथी राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वडील अमजद खान, भाऊ इस्माईल खान व पुतण्या साहिल हे देखील सोबत होते. शनिवारी पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. घराजवळ राहणारे चेतन गुप्ता यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

करीना दीदी यांचा जळगावात मोठा परिचय असल्याने नागरिकांनी घरी गर्दी केली आहे. शुक्रवारी रात्री गवळी बांधवांच्या सगर उत्सवात त्यांनी नृत्य देखील केले होते. करीना दीदी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर शिवाजीनगर स्मशानभूमी समोर असलेल्या कब्रस्थानमध्ये दफनविधी केला जाणार आहे.

पहा अंतिम दर्शनाचा व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज