कन्नड घाटातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण; अवजड वाहतुकीसाठी घाट खुला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । कन्नड घाटात सुरु असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या घाटातून दिवसा होणारी अवजड बंद करण्यात आली होती. दरम्यान, घाटातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्याने हा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत.

दि.३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळल्याने महामार्ग खचला होता. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. दरम्यान, प्रशासनाकडून या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करून दि.१५ सप्टेंबर रोजी दुचाकी व हलक्या वाहनांसाठी व त्यानंतर दि.९ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला करण्यात आला होता. मात्र घाटात काही ठिकाणी संरक्षण भिंत उभारणी व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे घाटात कोंडी निर्माण होऊन पूर्ण दिवस-रात्र वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या घाटातून होणारी अवजड वाहतूक दि.१७ ते २७ पर्यंत पूर्णतः बंद करण्यात आली होती. त्यानंतर हा घाट दि.५ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

घाटात सुरु असलेले संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्याने हा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून याबाबतचे आदेश महामार्ग प्राधिकरणाकडून नुकतेच देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -