मोठी बातमी : आजपासून कन्नड घाट हलक्या व लहान वाहनांसाठी खुला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र-52 (जुना 211) या महामार्गावर औट्रम घाटातील साखळी क्र. 376+000 ते 390+000 मधील रस्ता 31 ऑगस्ट, 2021 रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता. तसेच घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजुस दरी व दुसऱ्या बाजुस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलेला होता व वाहतुक वळविण्यात आलेली होती.

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व पाहणी करुन सद्य:स्थितीत औरंगाबाद ते धुळे वाहतुक करणाऱ्या दुचाकी व हलक्या/छोट्या वाहनांसाठी 15 सप्टेंबर, 2021 पासुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्या घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असुन अवजड वाहनांसाठी रस्ता सुरु करणे सुरक्षित नाही. त्यामुळे औरंगाबाद-धुळे वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी खालील मार्गाने वाहतुक वळविण्यात आलेली आहे.

सर्व प्रकारच्या अवजड वाहनासाठी औरंगाबादकडून धुळेकडे येणारी व जाणारी जड वाहतुक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांव-मालेगाव मार्गे धुळ्याकडे व औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतुक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांवमार्गे चाळीसगावकडे अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. असे महाव्यवस्थापक (तांत्रीक) तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -