fbpx

कर्जोद ग्रामपंचायती मध्ये शिवराज्याभिषेक दिन स्वराज्यगुढी उभारून साजरा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । रावेर तालुक्यातील कर्जोद येथे ग्रामपंचायतच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन स्वराज्यगुढी उभारून साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे व स्वराज्य गुढीचे पूजन गावातील सरपंच सौ अरुणा महाजन, व उपसरपंच नरेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामसेविका सौ कवीता बोदवडे सरपंच सौ अरूणा महाजन, उपसरपंच नरेंद्र महाजन, पोलीस पाटील अमोल महाजन, सदस्य अशोक वनारे, राजेंद्र तडवी, मोहन महाजन, व्यंकटससाणे, सौ सुरेखा सावळे, सौ सवीता महाजन, खान रिशादबी,सौ सुलभा महाजन,कुमारी रेखा ससाणे,तसेच उर्दू मराठी शाळेतील शिक्षक हनीफ शेख,शफीक शेख ,सौ. कल्पना वाघोदे, सलीमा तडवी, रामा महाजन, रामा मिस्तरी, नंदकिशोर पाटील, अकिल खान, देवीदास महाजन कर्मचारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज