fbpx

लाच घेताना उपविभागीय अभियंत्यासह कनिष्ठ अभियंता जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला तब्बल २ लाख ५८ हजाराची लाच घेताना आज मंगळवारी धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. उपविभागीय अभियंता दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधीलकर असे अटक केलेल्यांचे नाव आहे.

याबाबत असे की, धुळे येथील तक्रारदार यांनी नंदुरबार येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्याकडून आदिवासी मुलींच्या वसतिगृहातच्या कामाचा ठेका घेतला. या ठिकानी झालेल्या बांधकामाचे बिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून आदा करण्याच्या मोबदल्यात दिनेश पाटील आणि सत्यजित गांधीलकर यांनी तक्रारदाराकडून 2 लाख ५८ हजार रुपयांची लाच द्यायची मागणी केली. या विरुद्ध तक्रार केली असता, धुळे लाचलुचपत विभागाने सापळा रचून दोघांना रंगेहात अटक केली.  

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षकसुनिल कुराडे व पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक श्री.मंजितसिंग चव्हाण तसेच जयंत साळवे,कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरुषोत्तम सोनवणे,संदीप कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, महेशमोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज