भुसावळ शहरात आज जम्बो लसीकरण ; ‘या’ केंद्रावर होणार लसीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरात शुक्रवारी (दि.२२) १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा लसीचा डाेस दिला जाणार आहे. यासाठी ३ हजार ५२५ डाेस उपलब्ध आहेत.

शहरातील वरणगाव राेडवरील दवाखान्यात काेविशील्डचे २०० (पहिला व दुसरा प्रत्येकी १००), बद्री प्लाॅट दवाखाना, खडका राेड दवाखाना, पालिकेचा मुख्य दवाखाना, महात्मा फुले नगरातील दवाखाना येथे प्रत्येकी ४०० डाेस उपलब्ध आहे. ओसवाल पंचायती वाडा केंद्र ३५०, तर प्रमाणे नवशक्ती लसीकरण केंद्र, पालिका व राेटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली केंद्राकडे ४००, अहिल्या देवी कन्या शाळेत ३००, आदर्श हायस्कूल ५२५ डाेस उपलब्ध असतील. सकाळी १० ते ५ वाजेपर्यत लसीकरण चालेल.

एकही रुग्ण नाही
शहर आणि तालुक्यात गुरुवारी काेराेनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. कोरोनामुक्त झालेल्या शहरातील दोघांना डिस्चार्ज मिळाला. यामुळे तालुक्यातील सक्रिय रुग्ण संख्या ३ एवढी झाली. ऑक्टोबरच्या सुरूवातीला भुसावळ येथे काेराेना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले हाेते. मात्र, आठवड्यापासून दिलासा आहे. केंद्राकडे ४००, अहिल्या देवी कन्या शाळेत ३००, आदर्श हायस्कूल ५२५ डाेस उपलब्ध असतील. सकाळी १० ते ५ वाजेपर्यत लसीकरण चालेल.

दरम्यान. भारतात कोरोना लसीकरणाने काल १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यानिमित्त आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १०० कोटी डोस देण्यात आले आहेत. यात ७५% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज