fbpx

जुही पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । काही वर्षापूर्वी अवयवदानाची ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या जळगाव शहरातील जुही पवार या तरुणीने मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. सोशल मीडियात या भेटीचे फोटो व्हायरल होत असून अवयव दान चळवळीसंदर्भात पुन्हा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करण्याची संधी मिळावी यासंदर्भात भेट घेतल्याची माहिती जुही पवार यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना दिली.

मूळ जळगाव येथील असलेल्या जुही पवार या तरुणीने काही वर्षापूर्वी आपल्या यकृताचा ७० टक्के भाग वडिलांना दान केल्यानंतर अवयव दान चळवळीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून तिची ओळख झाली होती. तत्कालीन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी देखील तिचे कौतुक केले होते.

दरम्यान, तीन दिवसापूर्वी जुही पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. सोशल मिडियात या भेटीचे फोटो व्हायरल होत आहे. अवयव दान संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून सध्या अनेकांना अवयवाची आवश्यकता आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असून या माध्यमातून पुन्हा अवयव दान चळवळीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास चांगले कार्य घडू शकेल.

शरद पवार यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीशी भेट होणे ही मोठी बाब आहे. आम्ही ते फोटो आमच्या सोशल मिडिया अकाउंटला शेअर केले तेथून ते कुणीतरी सोशल मीडियात खाली ओळी टाकून पसरवल्या असाव्यात, अशी माहिती जुही पवार यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली. भेटीप्रसंगी जुही पवार यांच्या आई किरण पवार या देखील होत्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज