fbpx

विरावली ग्रा.पं.मध्ये अतिक्रमणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत जोरदार जुगलबंदी

सरपंचांचे घर अतिक्रमणात तर तीन अपत्य असताना उपसरपंचपद कसे?

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । चोपडा विधानसभेचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, विद्यमान आमदार सौ.लताताई सोनवणे तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे खास कट्टर समर्थक असलेल्या आणि शिवसेनेचा प्रभाव असलेल्या यावल तालुक्यातील विरावली येथील तसेच शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती आणि विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेना राष्ट्रवादीत जोरदार जुगलबंदी सुरू झाली आहे.

राजकीय प्रभावामुळे संबंधित अधिकारी दाखल दोघांच्या तक्रारीवर काय कार्यवाही करतात?किंवा राजकीय प्रभावामुळे एकतर्फी कारवाई करणार का?याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा विरावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्या गटातील हेमंत काशिनाथ पाटील सदस्यांने दि.3/5/2021रोजी लेखी तक्रार केल्याने यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी चौकशी सुरू केली आहे.

mi advt

हेमंत पाटील यांच्या तक्रारीनुसार यावल पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी के.सी.सपकाळे यांनी चौकशी करणेकामी विरावली ग्रामपंचायत सदस्यसखुबाई विजयसिंग पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा विरावली ग्रामपंचायत सदस्य तथा अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील, शोभाबाई युवराज पाटील यांना लेखी नोटीस काढून दि.12ऑक्टोंबर2021रोजी विरावली ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी कामी हजर राहण्याचे कळविले आहे.यामुळे तसेच सत्ताधारी गटातील एका महिला सदस्याला तीन अपत्य असताना उपसरपंच पद दिले गेले आहे,आणि इतर सदस्यांचे सुद्धा अतिक्रमण असताना विरोधी गटाच्या सदस्यांवर अतिक्रमणाची तक्रार केल्याने आता विरावली ग्रामपंचायत मध्ये तसेच यावल तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय जुगलबंदी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा विरावली ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील व पवन युवराज पाटील यांनी दि.8 ऑक्टोंबर2021रोजी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन ग्रामपंचायत विरावली सदस्यांनी अतिक्रमण केली असल्याची तक्रार दिली.गावात सन 2020-21मध्ये निवडून आलेले सरपंच,उपसरपंच,व तीन ग्रा.पं.सदस्य यांच्या विरुद्ध अतिक्रमण,तर उपसरपंच यांचे 3 अपत्य असल्याबाबत तसेच ग्रा.प.कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करतात या विषयी तक्रार यावल पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देत कार्यवाहीची मागणी केली.

2020-2021मध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच,ग्रा.सदस्य खालील प्रमाणे1)सरपंच कलीमा फिरोज तडवी यांचे व सासरे,पती,दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे.उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांच्या पती सासरे यांचे राहते घर व दीर यांचे घर व दुकान हे अतिक्रमित जागेत आहे.व त्याच बरोबर उपसरपंच यांना2001नंतर तीन अपत्य आहेत.3)ग्रा.प.सदस्य तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार(मुन्ना)सांडूसिंग पाटील यांचे घर सरकारी जागेवर अतिक्रमण असून नमुना नंबर 8 मध्ये घर क्र. 78यात व्हाईटर लावून मूळ क्षेत्र फळात बदल केला(खाडाखोद) आहे.शासकीय दस्तवेज मधून पुरावे नष्ट करणे व ग्रा.पं. दस्तऐवजा मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने मूळ दस्ताऐवजामध्ये फेरफार केली आहे.

त्यामुळे ग्रा.पं दस्ताऐवजाना धोका निर्माण झाला आहे.4) ग्रा.पं.सदस्य नथू नामदेव अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे अतिक्रमण आहे. 5)सदस्य इब्राहीम दलशेर तडवी यांचे व त्यांचे परिवाराचे देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्रा.पं.मासिक मीटिंग व इतर ग्रा.पं.कामात हस्तक्षेप करत असतात.तरी वरील सर्व1ते5 राहणार विरावली ता.यावल जि.जळगांव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण,तसेच 2001नंतर तीन अपत्य व ग्रा.पं. कामात कामात हस्तक्षेप करणे याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी व ग्रामपंचायत विरावली सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी केली.अशा प्रकारे दोघ परस्पर विरोधी गटातील सदस्यांनी(शिवसेना -विरुद्ध) राष्ट्रवादी एकमेकाविरुद्ध लेखी तक्रार केल्यामुळे आणि चौकशी सुरू झाली असल्यामुळे या प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आणि प्रभाव होणार का?आणि राजकीय प्रभाव पडला तर पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी राजकीय दबावाला आणि प्रभावाला बळी न पडता, पक्षपातीपणा न करता दोघांच्या तक्रारीवर नि:पक्षपणे कारवाई करतील का?याकडे संपूर्ण यावल तालुक्यातील राजकारणाचे लक्ष वेधून आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज