fbpx

..अखेर पत्रकारांना मिळाली लस

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार गेल्या वर्षभरापासून कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून पत्रकारितेचे काम करीत आहेत. पत्रकारांना कोरोनाची लस प्राधान्याने देण्यात यावी या मागणीला यश आले असून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरातील सर्व पत्रकारांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

जळगाव शहरात विविध माध्यमाद्वारे शेकडो पत्रकार, छायाचित्रकार, प्रतिनिधी कोरोना काळात देखील सेवा बजावत होते. पत्रकारांना कोविड लस देण्यात यावे अशी मागणी अनेक महिन्यांपासून होत होती. पत्रकारांची मागणी मान्य झाली असून रविवारी चेतनदास मेहता मनपा रुग्णालयात पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या उदघाटनप्रसंगी  पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.राम रावलानी, विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यासह जेष्ठ पत्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिबिराला जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन, आमदार राजुमामा भोळे यांनी भेट देत पाहणी केली.

दिवसभरात १५० वर पत्रकारांचे लसीकरण पूर्ण

दुपारपर्यंत १६२ पत्रकार नोंदणीसाठी आले होते. दिवसभरात लसीकरणासाठी आलेल्या सर्व पत्रकारांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. पत्रकारांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्याने सर्वांचे आभार पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज