विवेकबुद्धी पत्रकार व्हा..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । मोनाली लंगरे-देशपांडे भारतीय लोकशाहीचे चार आधारस्तंभ संसद, प्रशासन, न्यायपालिका हे तीन आधारस्तंभ आहेत यामधे चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्र म्हंटले जाते. मराठी वृत्तपत्राचे जनक आदरणीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या विसाव्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांनी वृत्तपत्राचा महाराष्ट्रात पाया घातला. म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री यांनी महाराष्ट्रातील पहिल्या वृत्तपत्राचे नाव “दर्पण” ठेवले. दर्पण चा अर्थ होतो. समाजाला त्याच्याच चालीरीती चे व अनिष्ट प्रथा परंपरा यांचे प्रतिबिंब दाखवावे.चेहऱ्यावरचा काळा डाग आरसा पाहून लक्षात येतो व तो आपण आरश्यात बघूनच साफ करतो.

वृत्तपत्र हे लोकांमधे लोकजागृती घडवन्याचे काम करतात, त्यामुळे लोकांची नीतिमत्ता सुधारते. राजकीय सुधारणांनाअधिक महत्त्व देण्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अधिक महत्त्व द्यावे म्हणून प्रत्येक वृत्तपत्र आपले काम करत असतात. मराठीतील सर्वात निर्भीड वृत्तपत्र म्हणून केसरीला गौरविण्यात येते.कारण लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे..पत्रकार कसा असावा त्याने निर्भीड पणे आपले मत समाजासमोर मांडावे.काय घडते आहे आपण काय करतो आहे काय दिसते आपल्याला ते समोर आणावे.सरकारवर निशाणा साधत टिळकांनी केसरी या वृत्तपत्राला निर्भीड वृत्तपत्र म्हणून ओळख करून दिली..पण, आजच्या वृत्तपत्रातील पत्रकार निर्भीड आहेत, होते परंतु आता नाही? कारण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच मत नाहीये

पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे विवेकबुद्धी वापरून जागृत ठेवून ज्यांना स्वतःचा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन मुक आवाजाला निर्णय करण्यापर्यंत लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे.पत्रकारांची नजर शोधक आसली पाहिजे, पत्रकारांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्ह तीन बाबिसमोर ठेवून लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना समाजाला डोळस करावे, पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकाव्यात आपल्या पत्रकारितेची चिकित्सा तथसत्पणाने करावी.त्यामुळे पत्रकार समाजातील काही दुर्बल घटकांना त्यांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात.पण, असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज कधीही विकसित होऊ शकत नाही.पत्रकार खरंच आपले कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतात तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजूने उभी राहत नाही.पत्रकारांनी मुक्त पत्रकाराचे शिक्षण जरी घेतले तरी ते मुक्त नाही होऊ शकत.

पूर्वीच्या काळात समाजात जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्रांनी केले.पत्रकारितेला एक वेगळे महत्त्व होते. आज अग्रलेख किती वाचतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.पत्रकारिता सौम्य होत चालली आहे.पत्रकारांनी त्यांच्या साधनांचा उपयोग भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी केला पाहिजे, परंतु आज असे होताना दिसत नाहीये.कुठे तरी त्यांना चौकटीत उभे राहावे लागते.उदा.म्हणजे काही घटकांवर लिहायचे ठरले म्हणजे त्यांच्यावर हल्ला होणार परिवारावर समस्या येणार.नाराजी ओढवून घ्यावी लागते. आपल्या लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशात पत्रकार सुरक्षित आहे का? त्यांचे जीवन सुरक्षित नाही. दहशतवाद राजकारण समाजकारण यांच्या हितसंबंधांना थोडाही धक्का पोहचला की पत्रकारांना त्यांचा जीव गमवावा लागतो.महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायदा मंजूर केला आहे पण अजून तो कायदा मंजूर झाला नाही.पूर्वीच्या काळात समाजात जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्रांनी केले.पत्रकारितेला एक वेगळे महत्त्व होते. आज अग्रलेख किती वाचतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजाचा आरसा,सतत कार्यमग्न असलेल्या पत्रकारांना पत्रकारदिनाच्या मनस्वी शुभेच्छा !

-मोनाली लंगरे-देशपांडे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -