fbpx

…म्हणून झेलम, सचखंड एक्स्प्रेस झाली रद्द

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । पंजाब राज्यात सुरू असलेल्या किसान आंदाेलनाचा रेल्वे दळणवळणास फटका बसत आहे. आंदाेलनामुळे झेलम आणि सचखंड एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.

किसान आंदाेलनमुळे पंजाब राज्यातून जाणाऱ्या झेलम एक्स्प्रेस आणि सचखंड एक्स्प्रेस या दाेन गाड्या रद्द करण्याचा निर्णय झाला. परिणामी शनिवारी (दि.२१) सुटणे अपेक्षित असलेली अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही गाडी रविवारी भुसावळात आली नाही. तसेच पुणे- जम्मुतवी झेलम एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा शुक्रवारी (दि.२०) सुटली नाही. परिणामी ती देखील रविवारी भुसावळात आली नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt