fbpx

यावलमध्ये पिस्तुलाच्या धाकावर लाखोंचे सोने लूटले ; शहरात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । यावल शहरातील सराफा गल्लीतील एका सराफा दुकानात चौघा दरोडेखोरांनी सराफाच्या कानशीलाला पिस्टल लावत लाखो रुपयांच्या सोन्याची लूट करीत पळ काढला. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांना अटकाव करताना त्यांचे दोन पिस्टल रस्त्यावर पडल्याचे समजते. 

सराफा बाजारात उडाली खळबळ

यावल शहरातील सराफा बाजारात जगदीश कवडीवाले यांचे मुख्य बाजारपेठेत बाजीराव काशिनाथ कवडीवाले नामक सराफा दुकान आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका पल्सर गाडीवर तीन अज्ञात दरोडेखोरांनी येऊन दागिने बनवायचे सांगितल्याचा बहाणा केला व त्यानंतर चौघा संशयीत आल्याने एकाने दुकानदार जगदीश कवडीवाले यांच्या कानशीलावर बंदुक लावत दुकानातील सोने काढून देण्यास भाग पाडले. अवघे पाच ते दहा मिनिटात लूट करून चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीचे काम सुरू आहेत. नेमका किती माल आणि रोकड दरोडेखोरांनी लुटून नेली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज