fbpx

वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी ‘जेट’ने केला करार; विमानतळाची पाहणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात शुक्रवारी विमानतळ व्यवस्थापन आणि जेट सर्व्ह एविएशन प्रा. लि. यांच्यात करार झाला. विमानतळावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

जळगाव वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यासाठी विमानतळ व्यवस्थापन आणि जेट सर्व्ह एविएशनमध्ये शुक्रवारी करार करण्यात आला. यासाठी विमान कंपनीची एक टिम जळगावात आली होती. या टिमने विमानतळावरील प्रस्तावित जागेची पाहणी केली. त्यानंतर पुढील वर्षभरात काम पूर्ण होवू शकेल याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या टिमसोबत चर्चा केली. जेट एविएशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. आर. ओला यांनी या वेळी जिल्हाधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

जळगाव विमानतळावर प्रस्तावित जागेची पाहणी करताना जेटचे अधिकारी.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज