जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : जिल्हा बँकेला आली जाग ; ७२ तासात वेबसाईटवरील तांत्रिक त्रुटी दूर करणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची बँक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेबसाईटची पोलखोल करणारी मालिका जळगाव लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आजपासून प्रसिद्ध करण्यात येणार होती. दरम्यान, बँकेच्या व्यवस्थापनाने जळगाव लाईव्हशी संपर्क करीत वेबसाईटमध्ये असलेले तांत्रिक दोष ७२ तासात दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. बँकेच्या वेबसाईटमध्ये असलेले तांत्रिक दोष (बग्स) कसे धोकादायक ठरू शकतात याबद्दल जळगाव लाईव्ह सविस्तर मांडणार होते.

जळगाव जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हक्काची बँक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रचंड मोठा आर्थिक व्याप असताना देखील बँकेने ज्याला वेबसाईटचे काम दिले होते त्यांनी काही तांत्रिक चुका केल्या होत्या. जळगाव लाईव्हच्या टीमने त्या सर्व तांत्रिक चुका शोधून मुंबई, पुणे आणि बँगलोरच्या वेबतज्ज्ञांचे त्यावर मत घेतले होते. जळगाव लाईव्हने शोधलेले दोष हे १०० टक्के खरे असून त्यामुळे बँकेचे नुकसान होऊ शकते याला देखील त्यांनी दुजोरा दिला होता. इतकंच नव्हे तर आणखी अतिरिक्त माहिती त्यांनी दिली होती.

जळगाव लाईव्हकडून जिल्हा बँकेच्या वेबसाईटची पोलखोल करणारी मालिका शुक्रवारपासून सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राफिक्स गुरुवारी रात्री सोशल मीडियात व्हायरल केले होते. यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने जळगाव लाईव्हशी संपर्क करीत वेबसाईटमध्ये असलेले तांत्रिक दोष (बग्स) पुढील ७२ तासात दूर करण्याचे आश्वासन जळगाव लाईव्हला दिले आहे.

शेतकऱ्यांच्या आणि बँकेच्या हिताच्या दृष्टीने जळगाव लाईव्हने जिल्हा बँकेच्या वेबसाईटमध्ये असलेले तांत्रिक दोषविषयी असलेली मालिका प्रसिद्ध करण्याचे ७२ तासांसाठी पुढे ढकलले आहे. बँक व्यवस्थापनाने पुढील ७२ तासात वेबसाईटमध्ये असलेले दोष दूर न केल्यास जळगाव लाईव्ह ते सर्व व्यवस्थापनाला लक्षात आणून देणार आहे. इतकंच नव्हे शेतकऱ्यांच्या आणि बँकेच्या हिताच्या दृष्टीने वेबतज्ज्ञांच्या मदतीने ते दोष दूर करण्यासाठी देखील बँक व्यवस्थापनाला सहकार्य करण्यास तयार आहोत.

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -