चाळीसगाव येथे 6 जानेवारी दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । समाजातील दिव्यांग घटकांची समस्या लक्षात घेऊन वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र मंडळातर्फे दि 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दृष्टी अंध कार्यशाळा डेरा बर्डी धुळे रोड चाळीसगाव येथे दिव्यांग वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लांबून येणाऱ्या दिव्यांगांसाठी पहिल्या दिवशी राहण्याची व्यवस्था मित्रमंडळाकडून केली असून सुदृढ भगिनी किंवा बंधूनी दिव्यांग व्यक्तीशी विवाह केलेला असेल त्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात दिव्यांग वधूवरांचा परिचय होऊन ज्या दिव्यांग वधू वर यांचे विवाह जुळल्यास मित्र मंडळाकडून त्यांचा विवाह करून देण्यात येणार असून अस्थिव्यंग (पोलिओ, अंध अल्पदृष्टी, मूकबधिर, गतिमंद या चार वर्गातील  विवाह इच्छुक दिव्यांग बंधुभगिनी नि आपला परिचय माहिती 3 जानेवारी पर्यंत 9308101010, 9028093333, 8308031118 (स्वयंदीप दिव्यांग संस्था व श्री डेव्हलपर्स चाळीसगाव) या नंबरवर पाठवावी असे आवाहन वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -