आमदार महाजन दाखवा, १० लाख मिळवा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले. जामनेरमध्ये कोरोना संकट गडद झालं असताना स्थानिक आमदार गिरीश महाजन हे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ‘आमदार गिरीश महाजन दाखवा आणि दहा लाख रुपये मिळवा’ असे फलक हातात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज जामनेर शहरात लक्षवेधी आंदोलनही केले.

संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात मागील काही दिवसापासून जामनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा परिस्थिती गेली 25 वर्ष लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने तालुक्यात थांबुन लोकांचे जीव वाचवावे प्रशासनाला हाताशी धरून जनतेची सेवा करावी हे काम सोडून आमदार साहेब भाजपाच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दंग आहेत. 

जनतेला वाऱ्यावर सोडून गायप असलेल्या आमदार महाजनांच्या अश्या वागणुकीबद्दल जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने ,”आमदार साहेब गेले तरी कुठे” आमदार दाखवा 10 लाख मिळवा  अश्या आशयाचे पत्र दाखवून शहरातील चौकात अभिनव आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेश(पप्पू) पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे युवक शहर अध्यक्ष विनोद माळी, अनिस भाई पहेलवान दिपक राजपूत सागर पाटील, किरण जंजाळ आणि अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज