जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । एप्रिलमध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद होणार आहे. त्यात देशभरातील विद्यार्थी संशोधक आपले संशोधन मांडणार आहेत. साडेपाच लाख विद्यार्थ्यांनी देशभरातून संशाेधन पाठवले. त्यात महाराष्ट्र व गुजरातमधून निवडण्यात आलेल्या दहामध्ये जळगाव येथील आर्किटेक्ट अंकिता अनिल शिंपीचा समावेश देखील आहे. ती सर्वसामान्यांसाठी सक्षम व प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक घर ‘हरित घर’ या विषयावरचे संशाेधन सादर करणार आहे.
देशभरातील पाच लाख विद्यार्थ्यांनी आपले विषय ‘केंद्रीय पर्यावरण संरक्षण गतिविधिया’ या विभागाकडे पाठवले होते. त्यातून दुसऱ्या टप्प्यात ६० संशोधकांचे प्रस्ताव निवडण्यात आले. यातून महाराष्ट्र व गुजरात मधील अंतिम दहांची निवड झाली. यात एकमेव निवड झालेली अंकिता ही महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. तिने केंद्राकडे सादर केलेल्या अभ्यासात्मक विषयाला मान्यता मिळाल्यास हरित घरांची संकल्पना लागू हाेऊ शकते. अंकिताला डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ती झरोका ग्रॉफिक्सचे संचालक अनिल व नितल शिंपी यांची कन्या आहे.
कशी झाली निवड:
एमआयटी,अभियांत्रिकी, आर्किटेक्ट, आयटी विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विभागाकडून विविध विषयांवर संशोधन मागवले जाते. पुणे येथे एमआयटीमधून एमएस्सीचे शिक्षण घेत असताना अंकिताने पर्यावरणपूरक घर निर्मिती विषयावर संशाेधन सादर केले. एमआयटी युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेताना केंद्राच्या माहितीनुसार भारतात हरित घर कसे असावे याबाबत सादरीकरण तिने केले. देशभरातून याविषयावर माहिती मागवण्यात आली. ऑनलाइन रेटिंग देण्यात आले. त्यात सर्वाधिक गुण मिळाल्याने निवड झाल्याची माहिती अंकिता शिंपीने दिली.
हे देखील वाचा:
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल
- धडधड वाढली! पोस्टल मतमोजणी सुरु