राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेत जळगावच्या आकांक्षाला २ सुवर्णपदक

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आयोजित १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत जळगावची खेळाडू आकांक्षा म्हेत्रे हिने २ सुवर्णपदक पटकविले.

राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेसाठी ४.६ किलो मीटरचा डोंगर-दरीतून चढ-उतार असणारा आव्हानात्मक ट्रॅक तयार करण्यात आला होता. मुलींच्या १० किमी वैयक्तीक टाईम ट्रायल व क्रॉसकंट्री ऑलिम्पिक या दोन्ही क्रीडा प्रकारात आकांक्षा म्हेत्रेने जिगरबाज सायकलिंगचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रीय एमटीबी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी आकांक्षा ही जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. तिने केलेल्या या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज